गुरुवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील यांनी दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, चंद्रकात पाटलांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”

narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

काय म्हणाले अजित पवार?

“महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होते. हे जगजाहीर होतं. फक्त त्यांना यश मिळण्यासाठी अडीच वर्षं थांबावी लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थापनेबद्दल सांगायची गरजच नव्हती”, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या निडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होईल म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनीही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “बारामतीला घेरणे इतके सोप्प नाही, इथे प्रत्येक जण आपल्या परीने काम करत असतो. शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असते, त्यामुळे भाजपा नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना, “मी दोन-अडीच वर्षांपासून आपले सरकार येईल, असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधली गेली आणि आपले सरकार आणले”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.