Ajit Pawar On Baramati Assembly Election 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे आज राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर आता काका आणि पुतण्यात लढत होणार आहे. यासंदर्भातच बोलताना आज अजित पवारांनी बारामतीत एक मोठं विधान केलं. ‘लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं करून तीच चूक त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यास सदा सरवणकर ठाम; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष!
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
amit thackeray mahim assembly constituency (1)
अमित ठाकरेंना वाटते ‘या’ गोष्टीची धाकधूक; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांना म्हणाले…
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार राजकीय नाट्याचा दुसरा अंक! अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार

अजित पवार काय म्हणाले?

“लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा-जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, “त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी (शरद पवार) असं करायला नको होतं. लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती, पण चूक केली आहे. आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.