राहाता : पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण, लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या एकत्रित पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी प्रवारानगर येथील सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा ते येत आहेत. शहा यांच्याशी होणारी जवळीक विखे परिवाराला भविष्यात फायद्याची ठरणार असल्याची चर्चा आहे.
अधिक माहिती देताना डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, प्रवरानगर येथील कारखान्याच्या नूतनीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यातून १० हजार टन गाळप क्षमतेच्या नवीन कारखान्याचे अंतिम काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचवेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे व पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या एकत्रित पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. सध्या या कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ७ हजार मीटर आहे. नवीन कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता १० हजार मेट्रिक टन असणार आहे. दोन्ही मिळून एकूण १७ हजार मे. टन गाळप करणार असल्याने पुढील पाच वर्षांत विखे कारखाना उत्तर महाराष्ट्रातील उच्चांकी गाळप करणारा एकमेव कारखाना असेल, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.
आशिया खंडातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याच्या उभारणीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सहकारी कायद्यामुळे कारखान्याच्या आधुनिकीकरणास अडचणी येत होत्या. परंतु, नवीन सहकारी कायदा अस्तित्वात आल्याने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना उर्जेतावस्था प्राप्त झाली, असाही दावा सुजय विखे यांनी केला.
केंद्रीय मंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी प्रवारानगर येथील सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा ते येत आहेत. शहा यांच्याशी होणारी जवळीक विखे परिवाराला भविष्यात फायद्याची ठरणार असल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या नूतनीकरणासाठी नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यातून १० हजार टन गाळप क्षमतेच्या नवीन कारखान्याचे अंतिम काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.