Amol Mitkari : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, पोस्ट अशा गोष्टी होत आहेत. त्यावरुन राजकारण तापलं आहे. दरम्यान विधान परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं, चित्रपट अशा कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राजसंन्यास ही राम गणेश गडकरींची कादंबरी, थोरांताची कमळा, बेबंदशाही, इथे ओशाळला मृत्यू अशा नाटक आणि चित्रपटांचा यात समावेश आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

आमदार अमोल मिटकरींनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या जुन्या पुस्तकांवर, चित्रपटांवर आणि नाटकांवर बंदी घालण्याची मागणी केली विधान परिषदेत केली. यामधे विकिपीडिया, यूट्युब आणि समाजमाध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. विकिपीडिया, शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसंन्यास या कादंबरीसह गुगल, यूट्युब, कादंबऱ्या, चित्रपट व कपोलकल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी व मानहानिकारक चित्रपट काढून टाकावेत. ‘राजसंन्यास’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ व ‘इथे ओशाळला मृत्यू’ आदी नाटके, चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरींनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करणारी २० नाटके, ४० पुस्तके आणि काही चित्रपट जी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी आहेत. ज्यात अधिक अपमानजनक उल्लेख आहेत आणि काही नाटके तसंच पुस्तके यांवर बंदीची मागणी केली. मी पुस्तके छापणे, प्रकाशन आणि वितरणावर प्रतिबंध लावण्याची मागणी करतो असं मिटकरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज भोयर यांनी काय म्हटलं आहे?

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधने समिती नेमण्याबद्दल सकारात्मक असून यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर मंत्री पंकज भोयर यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. पुढे ते म्हणाले अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातली गेली तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या नष्ट होतील आणि लेखकाचं कल्पना स्वातंत्र्या हा मुद्दा लक्षात घेतलाच जात नाही यामधे वसंत कानिटकर, राम गणेश गडकरी यांची ऐतिहासिक नाटकंही आहेत हा मुद्दाही विचारात घ्यायला हवा असंही पंकज भोयर म्हणाले. आता याबाबत सरकार पुढे काही निर्णय घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल