अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी कथित लव जिहादप्रकरणावरून अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला. तसेच पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला. यानंतर आता स्वतः अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संबंधित मुलगी स्वतः घरातून निघून गेल्याची माहिती दिली.

अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या, “ही मुलगी पुण्यात होती आणि आता ती पुण्यातून ट्रेनने साताऱ्याकडे जात आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. साताऱ्यात ती मुलगी ट्रेनमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ती एकटी होती आणि सुखरुप होती, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.”

हेही वाचा : “माझं फोन रेकॉर्डिंग का केलं?”, खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पोलिसांनी तिचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे. त्यात मुलीने एवढंच सांगितलं की, ती स्वतः रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. मुलगी अमरावतीत आल्यावर आम्ही तिचा तपशीलवार जबाब नोंदवू,” असंही आरती सिंग यांनी नमूद केलं.