शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

याप्रकरणी संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- “तुम्हीच मूर्ख आहात”, भरमंचावर शिवव्याख्याता खासदार अनिल बोंडेंशी भिडला, VIDEO व्हायरल

या संपूर्ण घटनाक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरून त्यांनी टोला लगावला आहे. “एखादं चांगलं औषध बनवा. जेणेकरून ते शांत होतील. महाराष्ट्रात शांती राहील. एकमेकांवर होणारी दगडफेक बंद होईल,” असा अप्रत्यक्ष टोला अमृता फडणवीस यांनी लगावला. त्या ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा- ‘एकाची निर्घृण हत्या, जन्मठेपेची शिक्षा अन् शहरभर दहशत’; राऊतांनी उल्लेख केलेला गुंड ‘राजा ठाकूर’ नेमका आहे कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता फडणवीस जेनेरिक औषधांसंबंधित एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी संजय राऊतांच्या आरोपांबद्दल विचारलं असता, त्यांनी नाव न घेता टोला लगावला.