लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून इंडीया आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे ८ कोटी १९ लाख ५९ हजारांची मालमत्ता असल्याचे नमुद केले आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.

supriya sule ajit pawar (3)
राष्ट्रवादीतील घराणेशाहीबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हो बरोबरच आहे, मी आणि अजितदादा…”
rohit pawar on devendra fadnavis god gift statement
“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!
Lok Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Live : “मोदींना फक्त चारच जाती माहीत आहेत, पहिली म्हणजे…”, नारायण राणेंचं विधान
eknath shinde
“लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; नेमका रोख कुणाकडे?

गीते यांनी २०१९ निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १ कोटी ७४ लाख ८८ हजार असल्याचे जाहीर केले होते. यात प्रामुख्याने बॅक खात्यातील ठेवींचा आणि गुंतवणूकीचा समावेश होता. त्यावेळी त्यांच्याकडे ५ कोटी ४४ लाख ३३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता होती. ज्यात मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तांचा समावेश होता. २ कोटी १३ लाख रुपयांची दायित्वाचा समावेश होता.यात गेल्या पाच वर्षात फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही.

आणखी वाचा-“शाळांना सुट्टी जाहीर करा”, राज ठाकरेंची सरकारला विनंती, मनसैनिकांना केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

गीते यांनी उमेदवारी अर्ज भरतांना दिलेल्या शपथपत्रात २०२४ मध्ये त्यांच्याकडे २ कोटी ३४ लाख २० हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच गेल्या वेळेसच्या तुलनेत यावेळी गीते यांच्या मालमत्तेत ५९ लाख ३२ हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर ५ कोटी ८५ हजार ३८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत स्थावर मालमत्ते ४१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर पुन्हा एकदा २ कोटी १३ लाख रुपयांचे दायित्व कायम असल्याचा उल्लेखही निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिसून येत आहे. त्यामुळे गीते कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे धनी असले तरी मंत्रीपद आणि खासदारकी गेल्यानंतर पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.