राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपा खासदार अनिब बोंडे यांनी दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले, “आजकाल टीव्ही लावला की…”!

नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे?

“’लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे. मेळघाटातल्या आदिवासी मुलींना फसवून पळवून आणल्या जाते. जर मुलींना विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना चिखलदरा तालुक्यातही समोर आली आहे. हे मुलं महाविद्यालयासमोर उभे राहुल मुलींवर लक्ष ठेवतात. तसेच फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते”, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project: “हा निर्णय बदलावा, प्रकल्प महाराष्ट्रात आणावा असं म्हटलं जातंय पण…”; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“’लव जिहाद’वर खासगी विधेयक आणणार”

“’लव जिहाद’ संदर्भात मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मी येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे. याबरोबरच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना एक महिना आधी सुचना दिली जावी”, असेही खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil bonde said we bring draft for love jihad in next parliamentry session spb
First published on: 15-09-2022 at 17:45 IST