scorecardresearch

Premium

सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संबंधित घडलेल्या या लाच प्रकरणात अडकलेल्या फौजदाराचे नाव विक्रम प्रतापसिंग राजपूत (वय ४०) असे आहे.

case against police officer in Solapur
सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सोलापूर : दाखल गुन्ह्यात अनुकूल तपास करण्यासाठी आणि यापूर्वी दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाने दोन लाख रूपयांची लाच मागितली आणि तडजोडीत एक लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याप्रकरणी सोलापुरातील एका फौजदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संबंधित घडलेल्या या लाच प्रकरणात अडकलेल्या फौजदाराचे नाव विक्रम प्रतापसिंग राजपूत (वय ४०) असे आहे. यात या पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांचेही नाव जोडले गेले आहे. माने यांना नुकतीच पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाली आहे.

How names of two lions Sita and Akbar
सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित
Preventive action against four accused in Ajay Baraskar case
मुंबई : अजय बारसकर प्रकरणातील चार आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
two men beaten to death by mob in thane
चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, अंबरनाथ शहरातील प्रकार, गुन्हा दाखल
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी

हेही वाचा – सांगली : अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

हेही वाचा – राष्ट्रवादी २००४ मध्ये भाजपासोबत न गेल्याचे दु:ख कोणाला असल्यास नाईलाज, जयंत पाटील यांच्याकडून प्रफुल्ल पटेल लक्ष्य

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास फौजदार राजपूत हे करीत होते. संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही ॲट्रासिटीसह इतर काही गुन्हे नोंद आहेत. प्राप्त गुन्ह्याचा आरोपीला मदत होण्याच्या अनुषंगाने अनुकूल तपास करण्यासाठी तसेच फौजदारी दंड संहिता कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार राजपूत यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीच्या मित्राने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. गेल्या ६ ऑक्टोबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात फौजदार राजपूत यांनी लाच मागून ती स्वीकारण्यासाठी तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना अखेर ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार व पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी ही कारवाई केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anti corruption department has registered a case against a police officer in solapur ssb

First published on: 01-12-2023 at 21:16 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×