महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेते सातत्याने भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. अशोक चव्हाण यांनी दीड महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. चव्हाण भाजपात गेल्यावर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते सातत्याने चव्हाणांवर निशाणा साधत आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत जे चव्हाणांचे सहकारी होते तेच आता चव्हाणांवर टीका करत आहेत. या टीकेला चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांमध्ये निर्णयक्षमता नाही. परंतु, कोणाबद्दल तरी बोलायला हवं म्हणून ते माझं नाव घेतायत. त्यांच्या मते अशोक चव्हाण सॉफ्ट टार्गेट आहे. अशोक चव्हाणांना आपण काहीही बोलू शकतो, त्यांना बोलल्यावर कोणाला काही फरक पडणार नाही. अशोक चव्हाणांवर टीका करणं सोयीचं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, प्रसारमाध्यमांवर सध्या ज्या काही बातम्या पाहायला मिळत आहेत, त्या पाहून असं वाटतंय की, जागावाटपात काँग्रेसला मोठं अपयश मिळालं आहे. या अपयशाचं लोकसभा निवडणुकीतल्या पराभवात रुपांतर होणार आहे. काही काँग्रेस नेते याचं खापर माझ्यावर फोडतायत. परंतु, ही अतिशय हास्यास्पद बाब आहे. काँग्रेसमधील नेत्यांना पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला हा उपद्व्याप आहे. मुळात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी काँग्रेस नेत्यांची परिस्थिती झाली आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील

मी काँग्रेसमध्ये असताना निश्चितच काँग्रेसला चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला. मी कॉंग्रेसमध्ये असाताना कोकणातील एकमेव भिवंडीची जागा इतर कोणत्याही पक्षाला न सोडण्याबाबत ठाम भूमिका घेतली होती. हिंगोलीची जागादेखील सोडली नसती. सांगलीची जागा सोडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मी या जागांसाठी प्रयत्न करत होतो. काँग्रेसला मुंबईत तीन जागा मिळाव्यात यासाठी मी आग्रही होतो. मुळात महाराष्ट्र काँग्रेसकडे मुत्सद्देगिरीचा आभाव आहे, त्यांच्याकडे व्यवहारचातुर्य नाही. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याइतपत त्यांचा अभ्यास नाही. नुसत्या बैठकीत बसून गप्पा मारायच्या, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवणं करायची, याचा हा सगळा परिणाम आहे. खरंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांना कुठल्याही जागावाटपामध्ये स्वारस्य राहिलेलं नाही. त्यामुळेच अपयश त्यांच्या पदरात पडलंय.

हे ही वाचा >>“नाना पटोले भर सभेत खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, अन् काँग्रेस…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

खासदार चव्हाण म्हणाले, जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (ठाकरे गट) काँग्रेसची धुळधाण केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मला काँग्रेस सोडून दीड महिना झाला आहे. तरीदेखील हे लोक माझ्यावर टीका करतायत हे हास्यास्पद आहे. यांच्यात निर्णयक्षमता नाही. परंतु, कोणाबद्दल तरी बोलायला हवं म्हणून ते माझं नाव घेतायत. कारण त्यांना वाटतं, आपण अशोक चव्हाणांना काहीही बोलू शकतो, त्यांना बोलल्यामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. अशोक चव्हाणांवर टीका करणं सोयीचं आहे. कारण असंही ते भाजपात गेलेत. त्यामुळे अशोक चव्हाणांवर खापर फोडण्याचा प्रकार चालू आहे. कारण लोकांच्या रोषाला सामोरं जायची त्यांच्यात हिंमत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षनेतृत्वाला काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच हे सगळे उद्योग चालले आहेत.