scorecardresearch

Premium

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

eknath shinde shivsena
प्रातिनिधीक फोटो

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

MLA of Sharad Pawar group
शरद पवार गटाच्या १० आमदारांना अपात्र जाहीर करा, अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
Arvind Kejriwal wins trust vote
“अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला;” मुख्यमंत्री म्हणाले, “या लोकांना विधानसभा संपवायची…”
ram mandir congress
उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?
karti chidambaram
कार्ती चिदंबरम यांना शिवगंगा मतदारसंघातून हटवण्याची मोहीम; अनेक नेते नाराज, तमिळनाडू काँग्रेसमध्येही पडणार फूट?

खरंतर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष निवडणूक; भाजपाच्या राहुल नार्वेकरांविरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी रिंगणात

त्यामुळे उद्या विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assembly speaker election whip issued by sunil prabhu to all sena mlas including eknath shinde ordered to vote rajan salavi rmm

First published on: 02-07-2022 at 17:11 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×