बीड : वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी वकीलाने वकील कक्षातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वा. उघडकीस आली आहे. विनायक लिंबाजी चंदेल (वय-४०)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वकील कक्षातील खिडकीला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.जानेवारी २०२५ रोजी चंदेल यांची नियुक्ती सरकारी वकील म्हणून झाली होती.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाड़े घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनेची माहिती घेतली.
दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक व्हघाडे यांनी दिली आहे.