जालना : अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी दुपारी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात झाला. पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न करणारे ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत होते.

धनगर समाजाच्या आरक्षणविषयक मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे मागील पाच दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी अॅड. सदावर्ते जालना शहरात आले होते.