यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्थेने ठेव पावत्यांची मुदत गेली चार- पाच वर्षे संपूनही त्याची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते यांच्या कराडमधील मोहिते हॉस्पिटलसमोर गुरुवारी सकाळी संतप्त सभासद ठेवीदारांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत; अनेक संघटनांकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

राज्याचे माजीमंत्री की जे थोर विचारवंत म्हणून नावलौकिकास असलेल्या यशवंतराव मोहिते यांच्या नावाने त्यांचे पुत्र डॉ. इंद्रजीत व काही कार्यकर्त्यांनी ही पतसंस्था सुरु केली. मोहिते यांच्या गावातच रेठरेमध्ये पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाची भव्य इमारतही आहे. यशवंतराव मोहिते यांच्यावर निष्ठा ठेवणारा खूप मोठा वर्ग कृष्णाकाठावर असल्याने त्यांनी या पतसंस्थेत मोठ्या विश्वासाने व्यवहार केले. मात्र, डॉ. इंद्रजित मोहिते व संचालक, प्रशासनाने ठेवीदार, सभासदांची घोर फसवणूक केल्याचे दिसते आहे.

डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनासारखा गंभीर प्रयत्न झाल्याने कृष्णाकाठासह सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या आंदोलनप्रकरणी बबनराव पाटील (आटके), शंभूराज पाटील (काले), दीपक पावणे (कासार शिरंबे) या आत्मदहन करण्याच्या प्रयत्नातील तिघांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा- संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, भाजपा आमदार भातखळकर म्हणाले, “खोके, गद्दार, खंजीर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेविरोधात ठेवीच्या पैशांसाठी खातेदार आक्रमक झाले आहेत. त्यातून आंदोलनेही झाली आहेत. परंतु, आश्वासने देवूनही ठेवीदारांना, सभासदांना त्यांचे पैसे परत न मिळत नसल्याने आता त्यांच्याकडून तीव्र आंदोलने होवू लागली आहेत. पतसंस्थेच्या अनेक ठेवीदारांनी कराडमधील मोहिते हॉस्पिटल म्हणजेच डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या घरासमोरच अंगावर इंधन ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर, तेथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत आत्मदहनाच्या पवित्र्यातील तिघांना ताब्यात घेवून पुढील अनर्थ टाळला.