भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालंय. त्यामुळे केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. असं असतानाही सांगलीमध्ये मंत्री जयंत पाटलांकडून पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकरांनी निशाणा साधला आहे. सावरकर भक्त असल्याने लतादीदींबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस असल्याचं त्यांनी म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ ट्वीट केलाय. तो व्हिडीओ जयंत पाटलांकडून करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा आहे. त्या व्हिडीओला त्यांनी “सावरकर भक्त असल्याने लतादीदींबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस” असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय.

भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “शिवाय हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. आपण गेल्या दोन दिवसांपासून पाहतोय की लतादीदींच्या दुखःद निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ जे करायला पाहिजे होतं, तसं त्यांनी केलं नाही. कदाचित त्या सावरकर भक्त होत्या, हिंदुत्ववादी विचारांच्या जवळ होत्या,जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पुण्यात हॉस्पिटल उभारले, त्या हॉस्पिटलचं उद्घाटन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे लता मंगेशकर यांच्या विषयी या सरकारच्या मनात एक सल होती. लतादीदींच्या निधनानंतर प्रथम केंद्र सरकारने दुखवटा जाहीर केला, त्यानंतर राज्य सरकारने आजची सुट्टी आणि दुखवटा जाहीर केला. असं असतानाही जयंत पाटील यांनी पुरस्कारांचं वितरण केलं. त्यामुळे या प्रकाराबद्दल केवळ जयंत पाटील यांनीच नाही तर राज्य सरकारने देखील भारताची माफी मागायला पाहिजे,” असं ते लोकशाहीशी बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul bhatkhalkar slams thackeray govt and jayant patil over awards ceremony held in sangli after lata mangeshkar death hrc
First published on: 07-02-2022 at 17:50 IST