अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
प्रत्येकाने स्वतची ओळख अर्थात क्षमता समजणे महत्त्वाचे असते. त्यातूनच आपली कार्यक्षेत्रनिवड योग्य होते. मग जेनू काम तेनू थाय, या उक्तीप्रमाणे व्यक्तीविकास होतो. आणि कोणाला ध्येयनिश्चिती साधताना गटांगळ्या खाव्या लागत नाहीत. स्वओळख, कार्यक्षेत्रनिवड आणि प्रतिभासाधना या त्रिसूत्रीतूनच लोक घडतात, देश घडतो. म्हणूनच हाती घेतलेले आवडते काम उत्तम रितीने करणे, हीच देशभक्ती ठरते आणि खरी ईश्वरभक्तीदेखील, असे प्रतिपादन माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी नुकतेच चिखलगाव येथे केले.
दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे लोकमान्य सार्वजिनिक धर्मादाय न्यास अर्थात लोकसाधना संस्थेतर्फे लोकनिर्माण भवन हे भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. धर्माधिकारी ते बोलत होते.
सध्याच्या युगात मनशांती गरजेची आहे. त्यातूनच क्रमाक्रमाने प्रसन्नता, एकाग्रता, विद्याभ्यास साधला जातो. यश-अपयशाचे िहदोळे अनुभवत असताना ही स्थिती फार महत्वाची असते.
न्यूरोसायंटीस्टनाही ध्यानधारणेतून येणाऱ्या मनशांतीचे शास्त्राळय महत्त्व पटलेलं आहे. विशेष म्हणजे अनेक व्यक्ती कोणत्याही बिकट परिस्थितीत ‘आनंदमूर्ती’ भासतात, त्या याच चित्तशुद्धीमुळे. त्यांनाच जीवन खऱ्या अर्थाने कळलेलं असतं, असं सांगत श्री. धर्माधिकारी यांनी ‘लोकसाधना’चे संस्थापक राजा आणि रेणू दांडेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
शिक्षणाच्या त्रिसूत्री विषद करताना त्यांनी लोकमान्यांच्या एका पत्राचा दाखला दिला. लोकमान्यांनी त्यांच्या मुलाला मंडाले तुरुंगातून एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात, जीवनात तुला काय करायचेय ते तुझे तू ठरव. चांभार व्हायचंय तर चांभार हो. पण चांभार झालास तर असा हो की लोक म्हणाले पाहिजेत की चप्पल घ्यावी ती टिळकांकडूनच. या तीन वाक्यात लोकमान्यांनी जीवनाचा सनातन अर्थ सांगितला आहे, असे स्पष्ट करत धर्माधिकारी यांनी स्वओळख, कार्यक्षेत्रिनिवड आणि प्रतिभासाधना हीच शिक्षणाची खरी त्रिसूत्री असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी भाषा अभ्यासिका आणि ‘हॅलो सखी’फेम डॉ. आसावरी बापट यांनीही रसाळ शैलीतील उद्बोधक भाषणात दांडेकर दांपत्याच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे, संस्थेचे विश्वस्त व बांधकाम व्यवसायिक वाय. जी. पटवर्धन, उपाध्यक्ष सुहास बाळ, संस्थेचे हितचिंतक उल्हास दातार आणि संस्थेचे संस्थापक व मानद अध्यक्ष राजा दांडेकर उपस्थित होते.
यावेळी राजा दांडेकर यांनी संस्थेच्या जडणघडणीचा धांडोळा घेताना अनेकांनी वेळोवेळी केलेली मदत, मार्गदर्शनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. कै. किशोर दातार आणि श्री. उल्हास दातार या बंधूद्वयींनी केलेल्या दोन कोटी रूपयांच्या देणगीवरच लोकनिर्माणभवनाची भव्यदिव्य वास्तू उभारली असल्याचा विशेष उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
यावेळी कार्यक्रमाच्या कैवल्य दांडेकर यांनी लोकनिर्माण भवनातील शैक्षणिक प्रकल्पांची माहिती दिली. संस्थेच्या विद्याíथनी प्राजक्ता खळे आणि गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले
. या लोकनिर्माण भवनामध्ये मुला-मुलींसाठी विविध कौशल्यविकास आधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार असून या प्रकारची ही जिल्ह्यातील एकमेव शिक्षणसंस्था ठरणार आहे.