मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात होता. परंतु, मी सध्या काँग्रेसमध्येच असून भविष्यात कुठे जाईन हे सांगता येणार नाही, असी प्रतिक्रिय बाबा सिद्दीकी यांनी दिली. ANI या वृत्तसंस्थेबरोबर त्यांनी संवाद साधला.

बाबा सिद्दीकी म्हणाले, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं मी कौतुक करतो कारण मी त्या सर्वांबरोबर काम केलं आहे. अजित पवार असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांचं काम सकाळी साडेसहा वाजता सुरू होतं. रात्रभर ते काम करतात. अजित पवार वर्कहोलिक आहेत.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

हेही वाचा >> “माझ्यावर अन्याय झाला तेव्हा अजित पवारांनी…”, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर झिशान सिद्दीकींचं स्पष्टीकरण

आमचं नशीब खराब की…

“आमदारांसाठी किंवा जे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत त्यांच्या केबिनमध्येही अजित पवार येतात. कारण त्यांना त्यांच्या आमदारांचं काम होणं गरजेचं वाटतं. कधीकधी आम्हाला असं वाटतं की आमचंच नशीब खराब आहे की आम्हाला असा नेता मिळाला नाही. एक माणसू म्हणून ते वर्कहोलिक आहेत, असं मीच नाहीतर सगळेच असं म्हणतात”, असंही ते म्हणाले.

तसंच, काँग्रेस सोडून अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांवर बाबा सिद्दीकी म्हणाले की, मी सध्या काँग्रसमध्ये आहे. भविष्यात कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही. जेव्हा मी अजित पवार गटात जाईन तेव्हा मी सर्वांना सांगून जाईन. जर नाही गेलो तर नाही सांगणार, अंसही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकीही अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.