प्रहारचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री होणार होते, तेव्हा अंबादास दानवे यांचा जन्मही झाला नव्हता. आम्ही दोन अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंना मंत्री केलं. तरी, देवेंद्र फडणवीसांच्या बच्चू कडू शिंदे गटात गेले. बच्चू कडूंचा मालक कोण?’ असं विधान अंबादास दानवेंनी केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बच्चू कडू म्हणाले, “दानवेंना सांगा, महाविकास आघाडीशीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार होते. तेव्हा अंबादास दानवे यांचा जन्मही झाला नव्हता. या राजकीय घडामोडीशी दानवेंचा कोणताही संबंध नव्हता.”

हेही वाचा : “सिनेट निवडणूक घेण्यास मिंधे-भाजपा सरकार घाबरतंय”, आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“उद्धव ठाकरेंना सुरुवातीलाच आम्ही दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी दानवेंचा जन्मही झालेला नव्हता. ते चौथी नापास आहेत,” असं टीकास्र बच्चू कडू यांनी सोडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक आहेत. शिंदेंनी भाजपात उडी घेतली नसती, तर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती,’ असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं, “आरोप करताना पुराव्यासह करायला पाहिजेत. कुठल्या कारणासाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये गेले असते? हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं.”