जुलै महिन्यात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-भाजपा सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची इच्छा नसेल. पण, वरून आदेश आल्यानंतर राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं असेल, असं बच्चू कडूंनी म्हटलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी संघटनांच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “शिवसेना सुरूवातीला मुस्लीम लीगबरोबर एकत्र होती. आता समाजवादी संघटनांबरोबर युती करत असेल, तर नवल काय? राजकारणात खुर्चीसाठी काहीपण, कधीपण आणि कुठेपण… काही राजकीय कार्यकर्ते विनाकारण निष्ठा दाखवतात. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनीही स्वप्न पाहिलं नव्हतं.”

हेही वाचा : “आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात भाजप दुफळी निर्माण करतेय”, नाना पटोले यांची टीका; म्हणाले, “मराठा आरक्षणावर…”

“भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आले. देवेंद्र फडणवीस म्हणालेले ‘अविवाहीत राहील, मात्र राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही.’ राजकारणात मी कुठं जाणार नाही, हे बोलता येत नाही. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा खूप राग होता. राष्ट्रवादीबरोबर जाणाची त्यांची इच्छा नसेल. पण, वरून आदेश आल्यावर फडणवीसांना राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं. अमित शाहांनी ‘तुम्ही अविवाहीत राहू नका’ असं सांगितंल असेल,” अशी मिश्कील टिप्पणीही बच्चू कडूंनी केली.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी कुणाबरोबर जावं, हा त्यांचा अधिकार”, शिंदे गटाच्या मंत्र्याचं सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडूंनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. “सुधीर मुनगंटीवारांना वाघ नखांशिवाय माघारी यावं लागलं. ५०-६० लाख रूपयांचा खर्च करून ब्रिटनला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डिजीटल इंडिया’ म्हणतात. आमचे मंत्री ब्रिटनला प्रत्यक्ष जाऊन माघारी येतात. हे चुकीचं आहे. मुनगंटीवार मोठे देशभक्त मंत्री आहेत,” असा खोचक टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.