शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला खिंडार पडलं आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आमचा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा केला जात आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

उद्या १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात नेमका काय निर्णय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. न्यायालयातील सुनावणीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मजबूत तयारी केली आहे. कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या सोयीचे झाले असतील, तर न्यायालयातील निर्णय त्यांच्या बाजुने लागेल, अशा आशयाचं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- अजित पवारांबरोबर झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शरद पवारांशी…”

सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “चिन्हापेक्षा मत कोणाला आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. मी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो. पतंग, विमान, नारळ आणि कपबशी अशी वेगवेगळी चिन्हं मला मिळाली. पण शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. चिन्हं कुणालाही मिळालं तरी काही फरक पडणार नाही. पण लोकांना वाटतं की, हे चिन्हं आम्हाला भेटलं पाहिजे.”

हेही वाचा- “मुली शिक्षणासाठी शहरात जातात अन् भाड्याच्या खोलीत मुलांबरोबर…”, ‘लिव्ह इन रिलेशन’वरून नवनीत राणांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे यांनी मजबूत तयारी केलीच आहे. परिपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. न्यायालयात भावनेवर निर्णय होत नसतात. ते निर्णय कागदावर होतात. कारण आपण कागदाला महत्त्व देतो. उद्या मी न्यायालयात जाऊन लढलो, तर तो निर्णय माझ्या बाजुने लागणार नाही. तुमच्याकडे कागदं कोणती आहेत. ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे कोर्ट पाहतं. कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या सोयीची कागदपत्रे तयार झाले असतील, तर निश्चितच निर्णय त्यांच्या बाजुने लागेल,” असं विधान बच्चू कडूंनी केलं.