बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. सांगोला तालुक्यातील माळवाड-नाझरे दरम्यान गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

अशोक नाना वाघामारे (वय ५०, रा. माडगुळे, ता. आटपाडी, जि.सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्या सोबत दुचाकीवर पाठुमागे बसलेला नाना आमोणे (रा. एकतपूर, ता. सांगोला) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या सांगोला ग्रामीण रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा… Maharashtra News Live: गुरू चोरणारे, वडील चोरणारे लोक आज राज्यात आहेत, पण संस्कार कसे चोरणार? उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरे येथे आयोजित आरोग्य शिबिरास भेट देण्यासाठी गेले होते. तेथून सांगोल्याकडे परत येत असताना नाझरे गावच्या पुढे काही अंतरावर त्यांच्या मोटारीपुढे संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या स्कार्पिओ गाडीवर समोरून विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने आदळला. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही इजा झाली नाही.