Maharashtra Live updates 2023: नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना आपली नाराजी पत्राद्वारे कळवली असून. विधीमंडळ पक्षनेते पद सोडण्याचा आपला निर्णयही कळवला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. या बैठकीत या कलहावर तोडगा निघणार का? या कडे राज्य काँग्रेसचे वेध लागले आहे.
काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, आता त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. हीच परिस्थिती चिंचवडमध्ये पाहण्यास मिळेल का? त्या प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कसबा आणि चिंचवडच्या दिवंगत आमदारांच्या निधनानंतर तातडीने पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आहे.
“चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही पिंपरी-चिंचवड शहराच्या परिवर्तनाची नांदी असेल. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश आलेच पाहिजे”, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकाहून सांगितले.
“चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असा टोला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे.
“संकट समयी येता कुणीही पुढे मदतीला येत नाही. पूजा म्हटली की सगळेच प्रसाद खायला येत असतात. मी संकटांना कधीच घाबरलो नाही. मी संकटात संधी शोधत असतो. जो मर्द असतो त्याला लढाई लढण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो”, अशी भूमिका आज उद्धव ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथे जैन समाजाच्या मेळाव्यात मांडली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपल्या आयुष्यात गुरु पाहीजेच. जो गुरुला विसरला तो माणूस असूच शकत नाही. आपल्याकडे आता गुरु चोरणारी लोकं तयार झाली आहेत, वडील चोरणारी लोकं तयार झाली आहेत. त्यांना चोरी करु द्या, पण संस्कार चोरी करुन येत नाहीत. ते जन्मजात असावे लागतात. चांगले संस्कार घेण्यासाठी आणि संस्कार जपण्यासाठी आज मी जैन मुनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे.”
२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राज्य बनविण्याचा व त्या दृष्टीने अधिकाधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडियाचा डाव होता. या अनुषंगाने एक डिजिटल पुस्तिकाच हाती लागल्याचा दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “मोदी-अदाणी भाई भाई” अशा घोषणाबाजी सुरु असतानाही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण थांबविले नाही. मागच्या काही काळात सरकारने केलेली कामे त्यांनी सांगितली. तसेच काँग्रेसने आतापर्यंत देशावर कसा अन्याय केला, याचीही माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्या सरकारवर राज्यांशी मतभेत असल्याचा आरोप लावला जातो. पण जेव्हा काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा ९० वेळा घटनेच्या कलम ३५६ चा दुरुपयोग झाला. या कलमाचा वापर करुन राज्य सरकारे पाडण्यात आली. फक्त एकट्या इंदिरा गांधींनी ५० वेळा या कलमाचा दुरुपयोग करुन राज्य सरकारे पाडली आहेत. एवढेच नाही तर केरळ मधील कम्युनिस्ट सरकार असो किंवा तामिळनाडूमधील करुणानिधी आणि एमजीआर यांचे सरकार असो, इंदिरा गांधींनी त्यांचेही सरकार पाडले होते.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतमी अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदाणी यांनी मागील २० वर्षांत भाजपाला अनेक रुपये दिले, असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर केंद्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. मागील काही दिवसांपासून विरोधक याच मुद्द्याला घेऊन आक्रमक झाले आहेत. आजदेखील त्याचे पडसाद राज्यसभेत उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात मोदी-अदाणी भाई भाई अशा घोषणा दिल्या. वाचा सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. शेरोशायरीचा वापर करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. जेवढा चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल, असं म्हणत मोदींना विरोधकांना टोला लगावला. यावेळी मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करत गांधी परिवारावरही शाब्दिक हल्ला चढवला. वाचा सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( ९ फेब्रुवारी ) राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर दिलं. तेव्हा पंतप्रधानांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, त्यांच्या वारसदारांना नेहरुंचं आडनाव लावण्यास काय भिती आहे? का नेहरू आडनाव लावण्यास लाज वाटते, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला. वाचा सविस्तर वृत्त
करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेचा यंदाच्यावर्षीचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिनाअखेरीस सादर होण्याची चिन्हे आहेत. अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात झाली असून या बैठकांनंतर अर्थसंकल्प अंतिम करून तो सादर केला जाणार आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होणार असल्याने कर दर वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले. सविस्तर वाचा…
आदित्य ठाकरे यांच्या महालगाव येथे झालेल्या सभेमध्ये कोणतीही दगडफेक झाली नसल्याचे पोलीस अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये माध्यमाच्या प्रतिनिधीला किरकोळ दुखापत झाली होती. हा प्रकार वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे पोलीस अप्पर अधीक्षक यांनी सांगितले. माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जे पत्र दिलेले आहे ते पत्राच्या अनुषंगाने तसा काहीच प्रकार घडलेल्या नसल्याची पोलीस उपाधीक्षकांनी सांगितले.
आपल्या वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अशीच एक टिपणी गुरुवारी पुण्यातील कार्यक्रमात केली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी सभागृहातील प्रेक्षकांना उद्देशून तुम्हाला इंटेलिजंट म्हणू की इंटेलेक्च्युअल असे विचारले आणि इंटेलेक्च्युअल्स लोकांनी मोठे नुकसान केले अशी टिप्पणी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षेच्या कामासाठी कंपनी शोधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र,त्यातील परीक्षेचा खर्च,त्यासाठी कंपनीची गुंतवणूक आदी अटी बघीतल्यास एखाद्या विशिष्ट कंपनीसाठीच या निविदा तयार करण्यात आल्या, असा आरोप अधिसभा सदस्यांनी केला असून त्याची तक्रार थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कड़े केली आहे.
कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार रियाझ शेख या आरोपीच्या चौकशीतून समोर आला आहे. मागच्या वर्षी मुंबई गुन्हे शाखेने आमदार राहुल कुल यांच्या तक्रारीवरुन सापळा रचत आरोपी रियाझ शेखला अटक केली होती. जून २०२२ रोजी सरकार बदलल्यानंतर काही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्यानंतर त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक केली गेली. त्यानंतर त्याचा सीडीआर तपासला असताना ही नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथील फास्ट ट्रॅगचा सर्व्हर रात्री एक वाजल्यापासून बंद पडल्याने मध्यरात्रीपासून टोल नाक्यावरून गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या होत्या. सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना, दुग्ध व्यावसायिक, कामगार या सर्वांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. सविस्तर वाचा…
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथील फास्ट ट्रॅगचा सर्व्हर रात्री एक वाजल्यापासून बंद पडल्याने मध्यरात्रीपासून टोल नाक्यावरून गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या होत्या. सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना, दुग्ध व्यावसायिक, कामगार या सर्वांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. सविस्तर वाचा…
कसबा आणि चिंचवडच्या दिवंगत आमदारांच्या निधनानंतर तातडीने पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा असे आवाहन केले आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. याच कारणामुळे त्यांना राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. वाचा सविस्तर
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. येथे रेल्वे भुयारी मार्ग उभारण्यासाठी रेल्वे ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रकात गुरुवार आणि शुक्रवारला बदल करण्यात येत आहे.
हडपसर भागातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून पाच महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती महादेव जाधव (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…
मुरबाड तालुक्यातील सरळगावाजवळ कोरावळे हद्दीत एका बिबट्याचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. याची माहिती मिळताच वन विभागाच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा पशू वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आला. या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. शारिरीक कारणामुळे शिकार करण्यास असमर्थ ठरल्याने उपासमार होऊनही हा बिबट्या मृत्यूमुखी पडल्याचे बोलले जाते आहे. सविस्तर वाचा…
पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोपरी पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे मुंबई- ठाण्याच्या वेशीवर असलेल्या या पूलावर सकाळी आणि रात्रीच्यावेळेत होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटकाझाली आहे. मागील चार वर्षांपासून पूलाचे काम सुरू होते. तांत्रिक अडचणी, करोनाकाळामुळे हे काम रखडले होते. सविस्तर वाचा…
विकासाच राजकारण महाराष्ट्राला हवं आहे. मागच्या अडीच वर्षात ज्या सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या, त्या आता पुन्हा गेल्या सहा सात महिन्यामध्ये हे सरकार आल्या नंतर सुरू झाल्या आहेत. बरीच कामं आहेत. चांगल्या प्रकारे मजबूत इनफ्रास्ट्रक्चर व्हाव म्हणून सरकार काम करत आहे. ठाण्यातील कोपरी पुलाच्या उद्घाटना वेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच आवश्यक ते नियोजन करावे. कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन मित्तल यांनी दिल्या.
कसबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुण्यातील कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करुन सोडणारी घटना घडली आहे. बारांबकी जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या (शहर) अनुदानाचा ५० हजारांचा पहिला हप्ता मिळाला आणि चार महिलांनी घर सोडून थेट प्रियकरासोबत पोबारा केला. चार महिलांनी अशाप्रकारे पतीला सोडून प्रियकारासोबत पळ काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पैसे घेऊन पत्नी पळल्यामुळे पतीचे मात्र आर्थिक नुकसान झालेच, त्याशिवाय गावात चर्चा झाली. त्यामुळे या चारही प्रकरणातील पतींनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाचा सविस्तर वृत्त
दुर्लक्षित केल्याची भावना सहकार गटात असतानाच शरद पवार यांचा दौरा सर्वच एकजुटीने यशस्वी करतील असा दावा, माजी खासदार सुबोध मोहिते यांनी केला आहे. सर्वच नेते आपल्या कार्यकर्त्यांसह साहेबांचा दौरा फत्ते करून दाखवतील, अशी खात्री मोहिते यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना दिली.
घोषित करण्यात आलेले व्यपगत (लॅप्स) प्रकल्प मार्गी लावून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अखेर महारेराने पुढाकार घेतला आहे. यासाठी विकासकांच्या सहा स्वयं विनियामक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.
क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू, तंत्रशुद्ध शैली, संयम व समतोलपणा, मेहनत, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती अंगी बाणणारे खेळाडू, अनेक पुरस्कार, सन्मान ज्यांच्या वाट्याला आले असे सर्वांचे लाडके ‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर.
बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, विचारांची देवाणघेवाण करणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
राज्य सरकारने महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी स्तन कर्करोग उपाययोजना आणि जनजागृती, मौखिक आरोग्य, थायरॉईडबाबत अभियान राबविण्यात येणार आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाने ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आता आनंद दवे यांनी थेट राज ठाकरे यांनाच ऑफर देत मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल, अशी थेट ऑफर दिली आहे. तत्पूर्वी राज ठाकरे ठाकरे यांनी कुणाचाही प्रचार करु नये, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले होते. पण राज ठाकरे आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत, त्यामुळे मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी दवे यांनी केली.
शहरात भरदिवसा कोयता गँगने माजविलेली दहशत, तसेच गंभीर गुन्हे रोखण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दररोज सायंकाळी तीन तास पायी गस्त घालण्याची योजना सुरू झाली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, असे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. महाविकास आघाडीचे माझ्यासमोर क्षुल्लक आव्हान आहे. गेल्या तीस वर्षांपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता असल्याने माझा विजय नक्की होईक, असा विश्वास भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या भागातून वाहन चालक वाहने हळू चालवित असल्याने वाहन कोंडी होते. वाहतूक विभागाने पालिका बांधकाम विभागाला वर्दळीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करुन घ्यावेत म्हणून मागणी केली आहे.
बारामतीमधील विकास किंवा पवार कुटुबियांच्या नावे भाजपची मंडळी नाके मुरडत असली तरी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कृषी प्रदर्शन आयोजित करण्याच्या उद्देशाने बारामतीमधील पवारांच्या संस्थेची पाहणी केली.
पुणे शहरातील शाळकरी मुलांमध्ये सध्या ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत असून, या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. ॲडिनोव्हायरस नावाच्या एका विषाणूमुळे सध्या शहरातील मुलांमध्ये हा संसर्ग दिसून येत असून, हा विषाणू श्वसनसंस्था, आतडी, डोळे आणि मूत्रमार्गाच्या अस्तरावर वाढतो.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जनहित आणि देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. शिवाय वैयक्तिक हितापेक्षा जनहित महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे नमूद करून प्रकल्पासाठी गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीची जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी योग्य ठरवला.
गेल्या वर्षी मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि त्यावर चालणारी अजान याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मंदिरांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्याचंही आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. आता या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. वाचा सविस्तर वृत्त
येत्या काळात नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. याकरिता एकूण २१ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
स्थानिक आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यात प्रशासनाला यश आले. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, याच टेकडीवर पुन्हा ६ नव्या खाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच निविदा मागवण्यात आल्याने पुन्हा एकदा खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारे शंभरहून अधिक जुना आणि जीर्ण झालेला अजनी रेल्वे पूल तोडण्यात येणार असून त्याऐवजी उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेच्या जागेवरील आणि पुलाच्या शेजारी असलेल्या २७ दुकानांवर बुधवारी बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आले.
एका वाहनाला धडकल्याने फेकल्या गेलेल्या दुचाकीस्वार महिलेचा मागून भरधाव आलेल्या बसखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत काँग्रेसनगर येथे बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
रेशीमबाग मैदानात नागपूर मेगा ट्रेड फेअर हॅन्डलूम हॅन्डीक्राफ्ट एग्जिबिशन ॲन्ड ॲम्युजमेन्ट पार्कच्या नावावर मोठे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनीतील वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल झुल्यांनी नागरिकांना भुरळ घातली असून त्यावर मोठी गर्दी जमत आहे.