April 2024 Bank Holidays List: एप्रिल महिन्यात गुढीपाडवा ते ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते राम नवमीपर्यंत अनेक सण व उत्सव साजरे होणार आहेत. या सणांची तयारी करताना आपल्याला बँकांच्या व्यवहाराचे अडथळे येऊ नये यासाठी आज आपण येत्या एप्रिल २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्या व बँक हॉलिडेजची यादी आज पाहणार आहोत. राष्ट्रीय सण/सुट्टी, शनिवार ( दुसरा आणि चौथा) व सर्व रविवार हे सर्वच राज्यांमधील बँकांसाठी सुट्टीचे दिवस असतात. तर शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही सुट्ट्या या ठराविक राज्यांसाठी विशिष्ट सणांच्या आधारे निश्चित केल्या जातात.

एप्रिलमधील सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहण्याआधी हे जाणून घ्या की, या सुट्टीच्या दिवशी ऑफलाइन बँकेच्या केवळ शाखा बंद राहतील, मात्र, मोबाइल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सेवा अखंडपणे चालू असतात. खालील सुट्ट्यांच्या कॅलेंडरच्या व्यक्तिरिक्त बँकेच्या वेळापत्रकातील कोणतेही अतिरिक्त बदल हे ग्राहकांना आधीच कळवले जातात.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

एप्रिल २०२४ मधील ‘या’ दिवशी बंद असणार बँक

तारीखवारसण- सुट्टी
09/04/2024मंगळवार गुढी पाडवा
10/4/2024बुधवार ईद उल फितर
11/04/2024गुरुवार ईद उल फितर
13/04/2024शनिवार दुसरा शनिवार
14/04/2024रविवार डॉ आंबेडकर जयंती
17/04/2024बुधवार राम नवमी
21/04/2024रविवार महावीर जयंती
27/04/2024शनिवारचौथा शनिवार

तुम्हाला माहित आहे का?

भारतातील बँकांच्या सुट्ट्या या १८८१ च्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यांतर्गत सूचीबद्ध आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तर्फे दरवर्षी संपूर्ण वर्षासाठी बँकांच्या सुट्टीचे कॅलेंडर प्रकाशित केले जाते. हे कॅलेंडर सर्व बँकांद्वारे फॉलो करणे अनिवार्य असते.