विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार भारतीय जनता पक्षात जातील किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात जातील अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. अलिकडेच अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याचं बोललं जात आहे. वेगवेगळे नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांना देखील याबाबत विचारण्यात आल्यावर कराड म्हणाले की, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे टीव्ही ९ मराठीशी बातचित करत असताना त्यांना सवाल करण्यात आला की, अजित पवार भाजपात येणार असल्याच्या चर्चा आहेत, यात काय सत्य आहे? यावर भागवत कराड म्हणाले की, फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. तसेच राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे १५ आमदार आहेत, त्यांच्यातही अस्वस्थता आहे.

हे ही वाचा >> “महायुतीत अजित पवार…”, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, म्हणाले, “भाजपा आणि आमचं टार्गेट सेट”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कराड म्हणाले की, या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेमागचं कारण म्हणजे तिकडे एकमेकांचं संगोपण नाही, एक विचार नाही. प्रत्येक आमदाराला वाटतं आपली कामं व्हावी, परंतु त्यांच्या सरकारच्या काळातही ते झालं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करेन. या नेत्यांनी राज्यात चांगली कामं केली आहेत.