गेल्या काही दिवसांपासून एकीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे दिल्लीतही विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. ही मागणी खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आणि समोर होते सत्ताधारी पक्षाचे आमदार भास्कर जाधव. राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली.

नेमकं झालं काय?

विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. “पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत”, असं राऊत म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिलं.

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”

मी जाहीर आव्हान देतो… – फडणवीस

“मी आव्हान देतो की नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. या सभागृहात नसणाऱ्यांविषयी बोलायचं नसतं कारण ते उत्तर देण्यासाठी इथे नसतात असा नियम आहे. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढा”, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.

“काला धन लाने का के नहीं लाने का?”

यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. “२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.

“महाराष्ट्राला प्रतिक्रिया द्यायला लावू नका”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी शिवसेनेचा इशारा!

“त्यांना लाज वाटली पाहिजे, फडणवीस भडकले”

यावर देवेंद्र फडणवीसांनी लागलीच भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. “पंतप्रधानांची नक्कल या सभागृहात चालणार आहे का? पंतप्रधानांची नक्कल करणं चुकीचं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे लाज”, असं फडणवीस म्हणाले. तसेच, “त्यांनी सभागृहाची माफी मागावी”, असं देखील फडणवीस म्हणाले.

भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण

दरम्यान, यानंतर भास्कर जाधवांनी पुन्हा उभं राहात स्पष्टीकरण दिलं. “मी काय बोललो, ते शांतपणे ऐकून घ्या. मी म्हणालो, २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ते कसे बोलले, ते मी सांगितलं. तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. आता तुम्ही ही चालाखी करत आहेत की पंतप्रधान असं बोलले नाहीत. तुम्ही म्हणताय की ते पंतप्रधान असण्यापूर्वी बोललेत. तसंच मीही सांगतो. ते पंतप्रधान होण्यापूर्वी असं म्हणाले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही, मी एका उमेदवाराची नक्कल केली”, असं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.