बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरतात. नगरसेवक पदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निमित्त आहे ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या बिचुकलेंचा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. त्यांच्या बाजूला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे तर, दुसरीकडे तत्कालीन गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील आहेत.

या सर्व प्रकरणावरती अभिजीत बिचुकले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “काही नालायक लोकांनी अशा पद्धतीने फोटो व्हायरल करून मुख्यमंत्रीपद आणि माझा अपमान केला आहे. त्यामुळे फोटो व्हायरल करणाऱ्यांना शोधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी. मी हे सहन करणार नाही. हा फोटो बिग बॉसमधील आहे,” असे स्पष्टीकरण बिचुकलेंनी दिलं आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून पुत्राचा कारभार ; छायाचित्र प्रसिद्ध करून राष्ट्रवादीची टीका

“मुख्यमंत्रीपद आपल्या राज्याची अस्मिता”

“मी समाजमाध्यमांचा वापर करत नाही. यापूर्वीही ‘करण कुंद्राने माझ्या पेढ्याच्या दुकानात दीडशे रुपयाला नोकरी करावी,’ असे काही माझे फोटो व्हायरल झाले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत संविधानाच्या दृष्टीने मला आदर आहे. जसे पंतप्रधानपद आहे, तसे मुख्यमंत्रीपद आपल्या राज्याची अस्मिता आहे. फोटो व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करावी,” अशी मागणीही अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. ते टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – “खुर्चीमागचा बोर्ड..”, श्रीकांत शिंदेंचं ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण; म्हणाले, “मी दोन टर्म खासदार आहे, मला…”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळेंचा फोटोही व्हायरल

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला.