शिवसेना ही एकच आहे, एकच होती आणि यापुढे एकच असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्याबाबत माझी मागणी अशी आहे की आधी सुप्रीम कोर्टाने अपात्रतेचा निर्णय घ्यावा तोपर्यंत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊ नये असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पक्ष जर बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल तर…

पक्ष जर का बाहेर गेलेल्या लोकांमुळे संपणार असेल किंवा पैशांच्या जोरावर फोडणार असेल तर मग लोकशाहीला काय अर्थ राहतो. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर केला तो जर त्यांच्या बाजूने असेल आणि कोर्टाने जर त्यांना अपात्र ठरवलं तर काय करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

मागचे सहा सात महिने लोक संभ्रमात

मागचे सहा-सात महिने शिवसेनेचं काय होणार? शिवसेनेला धनुष्यबाण, पक्षाचं नाव परत मिळणार की नाही? शिवसेनेशी गद्दारी करून स्वतःचं इप्सित साधणाऱ्यांनी पक्षावर दावा सांगितला आहे. निवडणूक आय़ोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालय १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शिवसेनेने जे काही मुद्दे होते ते निवडणूक आयुक्तांसमोर मांडले आहेत आणि लेखी स्वरूपातही दिले आहे. लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी मी आज भूमिका मांडतो आहे. कोणताही राजकीय पक्ष लोकांसाठीच स्थापन होतो. जर पक्ष निवडून आलेल्या लोकांवरच ठरणार असेल तर उद्या कुणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतो त्याला गद्दारी म्हणतात. रस्त्यावरचा पक्षही तेवढचा महत्त्वाचा असतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेकडे घटना आहे. शिवसेनाप्रमुख पद होतं. हे पद फक्त बाळासाहेब ठाकरेंनाच शोभून दिसतो त्यामुळे त्यांच्यानंतर आम्ही हा शब्द गोठवला. मी पक्ष प्रमुख म्हणून कारभार पाहतो आहे. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. गद्दारांनी आम्हाला आधी घटना मान्य नाही सांगितलं आणि नंतर घटनेप्रमाणेच काही पदांची निर्मिती केली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.