वार्ताहर, वाई       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावला (ता. खंडाळा) महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. यामुळे नायगावच्या विकासाला गती मिळणार आहे.

नायगावला महाराष्ट्र  शासनाने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा ही मागणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सावित्रीबाई फुले जयंती कार्यR मात नायगावचा  ब वर्ग पर्यटन स्थळात तातडीने समावेश करण्यात येईल असे सांगितले होते. याबाबत आवश्यक पूर्तता करून जिल्हाधिकारी श्व्ेाता सिंघल व प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांनी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता. नायगवचा ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश झाल्यामुळे नायगावला भविष्यात विकास कामासाठी, तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. नायगावचा  ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश टिळेकर, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, नागपूर मनपा नगरसेवक अविनाश ठाकरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा प्रस्ताव दाखल करण्यासाठी तत्कालीन सरपंच निखिल झगडे, सरपंच सुधीर नेवसे, आदेश जमदाडे, उपसरपंच अर्चना देवडे, सदस्य मेघनाथ नेवसे यांनी विशेष योगदान दिले. नायगावचा ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश केल्याने नायगाव ग्रामस्थ व फुलेप्रेमींमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthplace of savitribai naigaon get tourist spot status
First published on: 31-05-2019 at 03:10 IST