आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. शासकीय महापुजेसाठी उद्धव ठाकरे भर पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपुरात दाखल होताच उद्धव ठाकरे यांनी करोना आढावा बैठक बोलावत परिस्थितीची माहिती घेतली. उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरला पोहोचल्याने एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधक मात्र यावरुन टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर”
आषाढी एकादशी : भर पावसात मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून “स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं,” असं ट्वीट केलं आहे. याआधीही अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती. “मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,” असं ते म्हणाले होते.

दरम्यान अतुल भातखळकर यांनी शासकीय महापुजेवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “जो टिपू से करते है प्यार. वो क्यू करते है विठू माऊली को नमस्कार?,” असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे.

Mumbai Rain : मुंबईत पाऊसतांडव

विविध दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू

मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. अंधेरीतील फिरदोस बेकरीचा मालक असलेल्या तरुणाचा दुकानातील साहित्य वाचवताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर पोईसर येथील घटनेत एक जण दगावला. वांद्रे रेक्लेमेशन येथे ४५ वर्षांच्या एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp atul bhatkhalkar on maharashtra cm uddhav thackeray ashadhi ekadashi chembur mishap mumbai rain sgy
First published on: 20-07-2021 at 09:30 IST