माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे पत्र सोपवलं असून त्यासंबंधीचं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव असल्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पत्रात व्हाट्सअॅप-एसएमएसची भाषा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच चार दिवसांनी पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर मी…,” अनिल देशमुख यांचं मध्यरात्री ट्विट

ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??”

अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

पत्रात काय म्हटलं आहे –
“राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे,” असं अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं-
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil home minister anil deshmukh cm uddhav thackeray sgy
First published on: 25-03-2021 at 11:59 IST