ट्रॅक्टरने कारला समोरासमोर दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रासप नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे जखमी झाले आहेत. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

गुरूवारी सकाळी अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला जात होते. दरम्यान रणमोचन फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यात कारमध्ये मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले, तर अतुल गण्यारपवार व चालक हे एअरबॅगमुळे बचावले.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

PHOTOS: मित्राचा वाढदिवस, सेलिब्रेशन आणि अपघात…; वर्ध्यात सात मित्र जागीच ठार; संपूर्ण महाराष्ट्र हळहळला

थोड्या वेळाने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाने तिघांनाही ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम यांनी अतुल गण्यारपवार यांना ब्रम्हपुरी येथील सर्वोद्रय रुग्णालयात भरती केले. अतुल गण्यारपावार यांच्या मानेला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी रूग्णालयात जात घटनेची माहिती घेतली. आनंद गण्यारपवार यांच्या निधनामुळे चामोर्शीमध्ये शोककळा पसरली आहे.