scorecardresearch

“जिथं जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली”

“छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी वाचली, कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली”

BJP, Anil Bonde, Hijab Controversy, Chhatrapati Shivaji Maharaj
"छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी वाचली, कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली"

राज्यात आज अनेक ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. एकीकडे मनसे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमातनळाबाहेरील पुतळ्याला अभिवादन केलं. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला असून मुख्यमंत्र्यांनीच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली असताना सरकार अधिकृतपणे जाहीर का करत नाही? अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यादरम्यान भाजपा नेते अनिल बोंडे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे.

प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन करायचं आहे त्यांनी करा अभिवादन; अजित पवार सभागृहात संतापले

बार्शी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “एक गोष्ट लक्षात ठेवा अमरावतीला आम्ही होतो, त्यावेळी आम्ही समर्थपणे ताकद दाखवली. तेव्हा तरुण होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी वाचली, कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली”.

शिवजयंतीचा वाद विधीमंडळात; मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताच अजित पवारांचं उत्तर, म्हणाले “हे सरकार…”

“जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली. अयोध्येचं राम मंदिर, मथुरा किंवा काशी विश्वनाथ असो तिथे शेजारी मशीद तयार झाली”, असं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपले पोरं पोरी मजबूत राहिले पाहिजे, याचंही भान ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

“…तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल”

“परिस्थिती अशी आहे की तुम्ही आम्ही फक्त भारतमाचे पुत्र आहोत म्हणाल आणि नुसतं हातावर हात देऊन उभे राहिलात तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब, बुरखा घालणं अनिवार्य आहे त्याप्रमाणे घालावा लागला तर त्यात नवल वाटणार नाही,” असा इशाराच अनिल बोंडे यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader anil bonde on chhatrapati shivaji maharaj sgy

ताज्या बातम्या