आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी! वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल | BJP leader ashish shelar receives death threat letter from unknown person complaint filed in bandra police station | Loksatta

Ashish Shelar Death Threat : आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी! वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे.

ashish shelar
आशिष शेलार (संग्रहित फोटो)

Ashish Shelar Death Threat Letter : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांना एका पत्राच्या माध्यमातून ही धमकी मिळाली असून हे पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धमकीच्या पत्रात शिंदे गट, भाजपाविषयी असभ्य भाषेचा वापर

मुंबई पालिकेची निववडणूक कधीही जाहीर होऊ शकते. याच कारणामुळे भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार मागील काही दिवासांपासून मुंबईत भाजपा पक्षाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी निनावी व्यक्तीने दिली असून धमकीचे पत्र शेलार यांच्या कार्यालयात आले आहे. धमकीच्या या पत्रानंतर शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पत्रात भाजपा तसेच शिंदे गटाविषयी अभद्र भाषेचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका,” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “महाविकास आघाडीला…”

हेही वाचा >>> आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”

पोलिसांकडून तपास सुरू

धमकी नेमकी कोणी दिली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या धमकीच्या पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल तक्रारीनंतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या पत्रात भाजपा आणि शिंदे गटावर असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 21:37 IST
Next Story
सोलापुरात जड वाहतुकीचे वाढते बळी