महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. मात्र, मूठभर नेत्यांकडेच सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही नेत्यांकडे तीन-तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सुमारे सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकी नऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. अजित पवारांच्या या विधानावर आता भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

“अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं, हे जरी खरं असलं तरी अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते आहेत, असं मी मानतो. त्यामुळे फडणीवसांकडे सहा जिल्हे दोन वर्षे राहणार नाहीत. ही वेळेनुसार केलेली तडजोड आहे. असं तुम्ही तुमच्या कार्यकाळातही केलं होतं. तुम्ही सहा मंत्र्यांच्या मदतीने तीन महिने सरकार चालवलं होतं. त्यावेळी प्रत्येकाकडे आठ-आठ खाती होती” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

हेही वाचा- फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या राज्यात जेव्हा दोन पक्ष एकत्र काम करत असतात, तेव्हा खात्यांची किंवा जिल्ह्यांची सहमती व्हायला वेळ लागतो. या कालावधीत पालकमंत्रीपदं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच जातात. काही मंत्र्यांकडे तीन-तीन जिल्हे देण्यात आली आहेत. ते त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतील. कारण राजकारण हा आता अर्धवेळ काम करण्याचा विषय राहिला नाही. राजकारणासाठी पूर्णवेळ द्यावा लागतो. मी स्वत: १५-१५ दिवस घरी जात नाही. मोठेपणा म्हणून हे मी सांगत नाही, पण हेच सगळ्यांनी केलं पाहिजे.