Kirit Somaiya Criticizes Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे कागलमधील निवासस्थान तसेच पुण्यातील काही कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रं जप्त केली आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, किरीट सोमय्या पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार आहेत. मागील वेळी किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी मुश्रीफ यांना यावेळी मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा>>> Swami Vivekananda and Narendra Modi : नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म; भाजपा खासदार सौमित्र खान यांच्या विधानावरून वाद

“हसन मुश्रीफ यांच्यात मला अडवण्याची ताकद राहिली आहे का. मुस्लीम असल्यामुळे मला टार्गेट केलं जातंय, असे विधान त्यांनी केले होते. मुश्रीफ यांनी मला मागच्या वेळी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता मुश्रीफ यांचे काय हाल झाले. त्यांनी यावेळी मला रोखून दाखवावे, हिंमत असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावे. मला अंबाबाईचे दर्शन घेण्यास अडवले जाऊ शकते, मात्र मला तुम्ही केलेल्या घोटाळ्यांचा हिशोब घेण्यापासून तसेच हा हिशोब जनतेला सांगण्यापासून कोणी रोखू शकत नाही,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा>>> Amazon Layoffs : अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरकपातीस सुरुवात, भारतात १००० जणांची नोकरी जाण्याची भीती

“मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे मी पुरावे दिलेले आहेत. २००४ साली दोन कंपन्या बंद पडल्या होत्या. मात्र २०१३, २०१४ आणि २०१७ या वर्षात याच कंपन्यांच्या खात्यात ५० कोटी कसे आले. हजारो शेतकऱ्यांच्या नावाने पैसे घेतले. जावायाची कंपनी जन्मालाच आली नव्हती तरी कंत्राट देण्यात आले. मुश्रीफ यांचा हिशोब होणार आहे,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा>>> सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावे. आम्ही त्यांना विरोध करणार नाही, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. “किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यांव. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घ्यावे. आम्ही त्यांना अडवणार नाही. त्यांनी आमच्या कार्याची माहिती घ्यावी,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.