ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हसन मियाँना हिशोब द्यावाच लागेल असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा मला अडवलं होतं तेव्हा धर्म आठवला नाही का? गोरगरीबांचा पैसा खात होतात तेव्हा धर्म आठवला नाही का? ईडीने कारवाई सुरू केल्यावरच धर्म कसा आठवला असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

हे पण वाचाHasan Mushrif ED Raid: NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कागलमध्ये समर्थक आक्रमक

नेमकं काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या?

मला कोल्हापूरला जाऊ दिलं नव्हतं. पण आज मला महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीकडून मुश्रीफ यांच्या कुटुंबाच्या खात्यात १३ कोटी रूपये आले. जी कंपनी अस्तित्त्वात नाही त्यातून मुश्रीफ कुटुंबाला रक्कम येते आणि साखर कारखान्यात कशी जाते? असा प्रश्नही किरीट सोमय्यांनी विचारला आहे. मी मुस्लिम असल्याने हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत असं हसन मुश्रीफ म्हणाले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी जेव्हा लोकांचा पैसा खाल्ला तेव्हा तुम्हाला धर्म आठवला नाही का? ईडीने कारवाई केल्यावरच धर्म कसा आठवला असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

हे पण वाचा- हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांनी काय म्हटलं आहे?

NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातल्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या कारवाईनंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- किरीट सोमय्या यांची भविष्यवाणी अन् ‘ईडी’ची कारवाई

हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके काय आरोप आहेत?

कोल्हापूरच्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण आहे. या कारखान्यातला ९८ टक्के पैसा आर्थिक गैरव्यवहारातून उभा करण्याचा मुख्य आरोप मुश्रीफ यांच्यावर आहे.या घोटाळ्यात हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा प्रमुख सहभाग आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला. बिस्क इंडिया ही कंपनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांची आहे. या व्यवहारासाठी कोलकाता येथील शेल कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आल्याचाही आरोप आहे. या बोगस खात्यांमध्ये जमा केलेले पैसे मतीन मंगोलींच्या बिस्क इंडिया कंपनीत वळते केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.