"...असा चाफा फक्त 'मातोश्री'वर", एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र! | BJP leader narayan rane on shivsena chief uddhav thackeray rmm 97 | Loksatta

“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका!
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना आपण मागील ३९ वर्षांपासून ओळखतो, अगदी लहान असल्यापासून त्यांना पाहिलं आहे. त्यांना काहीही येत नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

घटनास्थळी उपस्थितीतांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.

हेही वाचा- “होय, त्याला फोन केला, पण…” चेंबुरच्या व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

उद्धव ठाकरेंना उद्देशून राणे पुढे म्हणाले की, त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली होती. पण हे सगळं महाराष्ट्र कसं सहन करत होता? हेच मला कळत नाही. त्या माणसाला काहीच येत नाही. मी ३९ वर्षे त्या माणसाला जवळून पाहिलं आहे. अगदी लहान असल्यापासून पाहिलं आहे. त्याला काहीही येत नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा- “आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम

या कार्यक्रमात सत्कार करताना नारायण राणे यांना ‘पुरुषार्थ’ नावाचं पुस्तक भेट देण्यात आलं. यावरूनही राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हे पुस्तक मला नाही, उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, असं राणे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
मुंबई महानगर क्षेत्रात गोवरचा उद्रेक; राज्यात दहा हजार संशयित रुग्ण
कलापिनी कोमकली यांच्याशी आज स्वरगप्पा
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी