scorecardresearch

Coronavirus : संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला मोठा सल्ला

घरून काम करणं, सुट्टया देणं हा विचार योग्य असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडे
राज्यात सध्या करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यातच सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखता येईल, असं त्यांनी व्यक्त केलं आहे. जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद ठेवली तर त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद केली तर लोकं जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर सात दिवसांसाठी लोकल सेवा बंद ठेवल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखण्यास मदत होईल. फक्त लोकांना आवश्यक असेल त्या वस्तूंच्या विक्रीची दुकांनं उघडी ठेवण्यात यावी,” अशा आशयाचं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

आणखी वाचा- आपल्यासाठी पुढील दोन आठवडे का अत्यंत महत्त्वाचे? वाचा ही माहिती

यापूर्वीही पंकजा मुंडे यांनी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचीही मागणी केली होती. “अधिवेशनाचा कालावधी कमी करणं, सुट्ट्या देणं आणि घरून काम करण्याचा विचार हा योग्य आहे. याची आता मी अंमलबजावणी करणा आहे. २ एप्रिलपर्यंत मीदेखील माझं कार्यालय बंद ठेवणार असून दौरेही रद्द करणार आहे,” असंही त्या म्हणाल्या. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

आणखी वाचा- CoronaVirus : महाराष्ट्रात पहिला बळी, दुबईहून आलेल्या रुग्णाचा मुंबईत मृत्यू

महाराष्ट्रात पहिला मृत्यू
देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईतून परतल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader pankaja munde said shut railways services for 7 days to stop spreading coronavirus jud

ताज्या बातम्या