सांगली : आगामी निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्यासाठी भाजपच्या आमदार, खासदार आणि पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी (८ जानेवारी) इस्लामपूरमधील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात होत आहे. या बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, सांगली, हातकणंगले लोकसभा व विधानसभा प्रचार प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या पाच दशकाहून अधिक काळ सांगली-पेठ रस्त्याचे काम प्रलंबित होते. या रस्ता कामासाठी केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ८६० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या कामाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्या सोमवारी होणार आहे. याचवेळी भाजप पदाधिकार्‍यांची महत्वाची बैठकही आयोजित करण्यात आली असल्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले पाटील यांनी सांगितले.

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये

हेही वाचा : राम मंदिराचा भाजपकडून निवडणुकीसाठी वापर? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रणनीती निश्‍चित करण्यात येणार आहे. पाच तास चालणार्‍या या बैठकीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आजी, माजी आमदार, खासदार, लोकसभा व विधानसभा समन्वयक, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.