मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीनंतर भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ असे ट्वीट करत भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.

Uddhav Thackeray Speech : कट करणारे कटप्पा, एकनाथ शिंदेंची दाढी आणि ‘पुष्पा’ चित्रपटाचा ‘तो’ डायलॉग.. उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात टोलेबाजी!

शिवाजी पार्कमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर चौफेर टीका केली. “अमित शाह बोलले होते की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं,” असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातील भाषणात म्हणाले आहेत. ही उद्धव ठाकरेंनी मारलेली थाप असल्याचे भातखळकर आपल्या ट्विटमधून सुचवू पाहत आहेत.

Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तींच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाहांवरही जोरदार टीका केली आहे. “अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री, हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवार. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत” अशा शब्दांत ठाकरेंनी अमित शाहांवर टीकास्त्र डागलं आहे.