पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी घरातील विजेवर चालणारे प्रकाश दिवे (बल्ब) बंद करून दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर विरोधकांनी टीकाही केली. देशात आरोग्य सुविधांवर लक्ष देण्याची गरज असताना पंतप्रधानांनी असं आवाहन करणं चुकीचं आहे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. मात्र, त्यानंतरही देशभरातून दीप जलाओ कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक अवकाशातून टिपलेला एक फोटो ट्विट करून विरोधकांवर टीका केली. पण, यावरूनच ते नेटकऱ्यांच्या रडारवर आले. हा फेक फोटो असल्याचं निर्दशनास आणून देत नेटकऱ्यांनी भातखळकरांना ट्रोल केलं.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे रविवारी रात्री नऊ वाजता देशभरातील नागरिकांनी घरातील लाईट बंद करून मेणबत्त्या, दिवे पेटवले. नऊ मिनिटं दिवे पेटते ठेवतं नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्हाट्सअपवर व्हायरल झालेला एक फोटो ट्विट केला. त्याचबरोबर हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. करोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. करोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहानं टिपलेलं छायाचित्र,”असं सांगत भातखळकर यांनी विरोधकांना सुनावलं. पण, हा फोटो फेक असल्याचंही नासानं म्हटलं आहे. तोच फोटो भातखळकर यांनी ट्विट केला. या फोटोवरून नेटकऱ्यांनी भातखळकर यांना चांगलंच ट्रोल केलं.
हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान @narendramodi यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. करोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. करोनाच्या संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा उपग्रहाने टिपलेले छायाचित्र…#LightForIndia pic.twitter.com/31OMgRX2oc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 5, 2020
“सर, आमदार आहात आपण. ते पण गौरवास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे. जरा संवेदनशीलपणे वागा की साहेब,” असं आशिष मेटे यांनी या ट्विटवर म्हटलं आहे.
सर आमदार आहात आपण ते पण गौरवास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे जरा Sensible वागा की साहेब.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Ashish Mete (@IAshishMete) April 5, 2020
“भातखळकर, नासानं हा फोटो फेक असल्याचा खुलासा बऱ्याच पूर्वी केला आहे नासापेक्षा तुम्ही मोठे आहात का?,” असा प्रश्न प्रतिक पाटील यांनी विचारला आहे. तर “हा उपग्रह आरएसएसचा असणार नक्कीच,” असं एका नेटकऱ्यांनं म्हटलं आहे.
उपग्रह RSS चा असणार नक्कीच…
— Quarantined Intrigued (@IntriguedSpeaks) April 5, 2020
अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न भातखळकर यांच्या ट्विटवर आल्या आहेत. हे ट्विट भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे.