राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे राजकारणात जास्त सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर टीका करत आहेत. अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ पार्टी असा केला होता. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “सुप्रिया सुळे आता फार सैरभैर झाल्या आहेत. त्या संपूर्ण राज्यातील पक्ष फोडायच्या, घराणे फोडायच्या. आता त्यांचंच घर आणि त्यांचाच पक्ष फुटला आहे. त्यामुळे त्या आता सैरभैर झाल्या आहेत. त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.”

हेही वाचा- “भुजबळांचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यांना गुगली…”, शरद पवारांवरील आरोपांवर अनिल देशमुखांची ‘बॅटींग’

“एकेकाळी ५०-५० आमदार त्यांची वाट पाहत त्यांच्या दारात उभे राहायचे. आता दोन-चार आमदारही शिल्लक राहिले नाहीत. मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांच्या गाड्या त्यांच्या दिमतीला असायच्या. ते सर्वजण यांची वाट बघत बसायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या मनात संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे,” असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला.

हेही वाचा- अजित पवारांना लांडग्याचं पिल्लू म्हणणं पडळकरांना भोवणार? मिळाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने काम करत आहे. लोकांमध्ये जात आहे. त्यामुळे भाजपाला त्यांनी काहीही म्हटलं तरी आमची पार्टी जनतेतील पार्टी आहे. जनता भाजपाबरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व आहे, असं मला वाटत नाही.”