शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला असून आज कोर्ट निर्णय देणार आहे. दुपारी ३ वाजता निर्णय दिला जाईल असे जिल्हा सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी दोन्ही बाजूंच्या वकीलाना सांगितलं. दरम्यान त्याआधीच नितेश राणेंना एक मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणे यांचे सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यात सकाळी हजर झाले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी आज सकाळी त्यांना कोर्टासमोर हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाण्यात आली आहे.

सरकारी पक्षातर्फे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. यामध्ये इतर आरोपींना अटक, मोबाइल हस्तगत करणे हे मुद्दे मांडण्यात आले. पण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला.

आमदार  राणे यांच्या जामीन अर्जावर  मंगळवारी दुपारी ३ वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड प्रदीप घरत यांनी केली. मात्र ही मागणी जिल्हा न्यायालयाने अमान्य करीत आ. राणे यांना न्यायालयातून जाण्याची मुभा दिली आहे. याबाबतचा निकाल देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते या दरम्यान पोलिसांनी कारवाई करु नये अशी राणे यांना मुभा दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख  संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेलं अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली. तर बचाव पक्षाने हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा मुद्दा मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्य मंगळवारी दुपारी ३ वाजता याबाबतचा निकाल जाहीर करणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे.