भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी धमकी मिळाल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवले, अशा आशयाचं विधान अजयकुमार मिश्रा यांनी केलं.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानवरही प्रतिक्रिया दिली.

Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

हेही वाचा- “संभाजीमहाराज स्वराज्यरक्षक होते, त्यांनी…”, महापुरुषांबाबतच्या वादावर उदयनराजेंनी मांडली भूमिका

पत्रकार परिषदेत अजयकुमार मिश्रा म्हणाले, “अजित पवारांवर त्यांचे काकाही विश्वास ठेवत नाहीत. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला विधानसभा विरोधी पक्षनेता बनवणार होते. ऐनवेळी मिळालेल्या धमकीमुळे अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद दिलं.” मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी ही लोक आहेत, असा टोलाही अजयकुमार मिश्रा यांनी लगावला.

हेही वाचा- सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांचं वक्तव्य; म्हणाले, “माणसं फोडून…”

“छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू,” असंही मिश्रा म्हणाले.