scorecardresearch

“आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद देशात कोणातही नाही”, खासदार गोपाळ शेट्टींचे विधान, विरोधी पक्षांना दिला ‘हा’ सल्ला

‘आरएसएस’ ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे, असे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत

“आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद देशात कोणातही नाही”, खासदार गोपाळ शेट्टींचे विधान, विरोधी पक्षांना दिला ‘हा’ सल्ला
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील बंदी घालण्याची मागणी काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. या नेत्यांना उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आरएसएस ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेवर बंदी घालण्याची ताकद देशात कोणातही नाही, असे शेट्टी म्हणाले आहेत. विरोधी पक्ष भाजपा आणि आरएसएसवर उठसूठ आरोप करत असतात. त्यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत असेच आरोप करत राहावेत. यामुळे आमचे कार्यकर्ते आणखी जागरुक होतील, असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे.

“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”

आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी म्हणजे या संघटनेवर हल्ला करण्याची नवी पद्धत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. पीएफआयवरील कारवाईनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आरएसएस एक हिंदू अतिरेकी संघटना आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे. दरम्यान, लालू यादव हे मतांचे राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपाने पलटवार केला आहे.

“ही तर PFI पेक्षा वाईट संघटना,” RSS चे नाव घेत देशातील बड्या नेत्याने केली मोठी मागणी

लालू प्रसाद यादव यांच्याआधी केरळमधील काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. “असे मुर्खासारखे बोलणारे लोक अनेक आहेत. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात” अशी तिखट प्रतिक्रिया या मागणीवर फडणवीस यांनी दिली होती.

विश्लेषण : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; पुढे संघटनेचं आणि सदस्यांचं काय होणार? जाणून घ्या

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) मंगळवारी आठ राज्यांमध्ये पीएफआयवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत १७० जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी २२ सप्टेंबरला १५ राज्यांत छापे घालून एनआयएने पीएफआयच्या १०६ कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली होती. या कारवाईची दखल घेत बुधवारी केंद्र सरकारने पीएफआयला बेकायदेशीर ठरवत बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या