भाजपाचे खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान अधिक की महात्मा गांधींचं असा प्रश्न विचारल्याची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी गांधींच्या ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्रात सावरकर बंधुंवर लिहिलेल्या लेखाचा संदर्भ देत या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते नागपूर येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत बोलत होते.

सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “मला वीर सावरकर आणि महात्मा गांधींचा फोटो दाखवण्यात आला. तसेच प्रश्न विचारण्यात आला की, दोघांपैकी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जास्त योगदान कुणाचं? मी या प्रश्नावर असं उत्तर दिलं की, २६ मे १९२० रोजी महात्मा गांधींनी यंग इंडियात महात्मा गांधींनी एक लेख लिहिला. त्याचा मथळा होता ‘सावरकर ब्रदर्स’. त्यात गांधींनी लिहिलं की, सावरकर बंधू चतूर, धाडसी आणि देशभक्त आहेत. त्यातील एक विनायक दामोदर सावरकर यांना ते लंडनमध्ये भेटले होते. सावरकरांनी ब्रिटिशांमधील चुकीच्या गोष्टी माझ्याआधी ओळखल्या होत्या.”

“ब्रिटिशांचा वाईटपणा गांधींआधी सावरकरांनी ओळखला”

“यावर प्रश्न विचारणारा म्हटला की, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी त्याला सांगितलं की, मी तर गांधींनी काय लिहिलं हे सांगितलं. गांधी म्हणालेत की, ब्रिटिशांचा वाईटपणा माझ्याआधी सावरकरांनी ओळखला आहे. आता गांधीच सावरकर पुढे असल्याचं म्हटले होते. त्यामुळे आता कोणत्याही गोंधळाला जागा उरत नाही,” असं मत सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : अमित शाहांना का भेटल्या? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “कारण देवेंद्र फडणवीस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महात्मा गांधींना सावरकर लक्षात आले, मात्र आजच्या गांधींना नाही”

“गांधींनी पुढे असंही लिहिलं की, सावरकर आपल्या देशावर खूप प्रेम करतात. त्यामुळेच ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत. ते न्यायपूर्ण व्यवस्थेत असते, तर ते एका उच्च पदावर बसलेले असते. महात्मा गांधींना सावरकर लक्षात आले होते, मात्र, आजच्या गांधींना सावरकर समजत नाही. त्याला आम्ही काय करू शकतो,” असंही त्रिवेदींनी नमूद केलं.