शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याची माहिती आहे. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ईडी’च्या धाडी टाकून सरकार बनवता येईल असं मानणारे मूर्ख”

“ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे. बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे जिल्ह्यात आणि शहरात चालतात. ठाण्यातील शिवसेनेच सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून ठाण्यात भ्रष्टाचार उघड आहे हे ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा दावा निलेश राणे यांनी टीव्हीनाईनशी बोलताना केला.

कितीही दबाव टाकलात तरी एक लक्षात ठेवा…- छगन भुजबळ

“ईडी ही सरकारची एजन्सी आहे. त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. जर प्रतार सरनाईक यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या नसतील तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. सरकारची एजन्सी कोणाला तरी काहीतरी वाटतं म्हणून काम करत नाही. त्यांच्याकडे काही माहिती आली असेल किंवा तक्रार आली असेल, म्हणून ही कारवाई केली जात असणार”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp vs shivsena all uddhav thackareys shivsena leaders in thane are corrupt slams nilesh rane also quotes thane municipal corp is university of corruption vjb
First published on: 24-11-2020 at 13:25 IST