सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही तरुण आमदारांमध्ये संघर्ष होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी आशीर्वाद घेण्यासाठी काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींची सोलापुरत भेट घेतली. दोघा उमेदवारांना महास्वामीजींनी विजयासाठी आशीर्वाद दिले आहेत. परंतु यापैकी नक्की कोणाला आशीर्वाद मिळणार, यावरून समाज माध्यमांतून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे स्वतः महास्वामीजीही पेचात पडल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते दोघेही तरुण आणि तुल्यबळ आहेत. दोघेही आक्रमक आहेत. आमदार सातपुते यांनी उमेदवारी जाहीर होताच सोलापुराता दाखल होऊन होटगी बृहन्मठात धाव घेऊन काशी जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींची भेट घेतली होती. महास्वामीजींनी त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले होते. त्याचे वृत्त प्रसार माध्यमांसह समाज माध्यमांमध्ये झळकताच त्यास काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी उत्तर देत काशी जगद्गुरूंचा खरा आशीर्वाद आमदार प्रणिती शिंदे यांनाच असल्याचा दावा करीत, भाजपला टोला लगावला आहे.

bacchu kadu, Ramtek,
बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
youths celebrate rang panchami with enthusiasm in solapur zws
सोलापुरात रंग पंचमीत तरूणाईचा उत्साही जल्लोष  
Swami Samranandji Maharaj a stalwart figure of Indian spiritual faith passed away
स्वामी स्मरणानंद यांचे अनंत प्रस्थान

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगद्गुरूंची भेट घेऊन राजकीय देखावा करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केला आहे. याउलट, गेल्या नोव्हेंबरमध्येच सोलापूरच्या कुंभारी गावात काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः महास्वामीजींनी सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला होता. तसेच खासदारकीसाठी प्रणिती शिंदे पात्र असल्याचा निर्वाळा देत शिंदे पिता-पुत्रीस आशीर्वाद दिला होता. नंतर लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीही सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले आहेत, असा दावा सुरेश हसापुरे यांनी केला आहे.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

त्याच्या पुष्टीसाठी दोन्ही घटनांप्रसंगीच्या छायाचित्रांसह माहिती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. आशीर्वादासाठीच्या दावा-प्रतिदावा पाहून स्वतः जगद्गुरूही पेचात पडले असतील, अशी चर्चा चविष्टपणे होत आहे. जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्यांचा वीरशैव लिंगायत समाजावर मोठा प्रभाव आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरतात. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा राखीव लढतीत गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना भाजपकडून निवडून आणण्यात वीरशैव लिंगायत समाजाचा मोठा वाटा होता.