चंद्रपूर-गडचिरोली ब्राह्मण सभा व ब्रह्मवादिनी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांतर्फे निर्मित वस्तूंचे प्रदर्शन तथा विक्री रविवार, ८ मार्चला प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां नंदिनी देवईकर, चंद्रपूर-गडचिरोली ब्राह्मण सभेचे पदाधिकारी, तसेच ब्रह्मवादिनी महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
प्रदर्शनी व विक्री सकाळी १० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत सुरू होती. त्यात ३० स्टॉल्स लावण्यात आले होते. सभागृहात पूर्ण वेळ गर्दी होती. तसेच दिलेला वेळही कमी पडला. त्या प्रदर्शनीला हजारो लोकांनी भेट दिली.
पूर्ण स्टॉल्सवर असलेल्या वस्तू विक्रीकरिता उपलब्ध होत्या. दिवसभरात सर्व स्टॉल्सवर ९० हजार रुपयांची विक्री झाली. भेट दिलेल्या लोकांनी आपला अभिप्रायही नोंदविला. चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम चंद्रपूर-गडचिरोली ब्राम्हण सभा व ब्रम्हवादिनी महिला बचत गटातर्फे राबविण्यात आल्यामुळे समाजातील सर्व महिलांना एक नवीन प्रकारे व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन देऊन समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला.
सर्व महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने एक पाउल टाकण्यात आले. हीच बांधिलकी प्रत्येक वेळेस जपण्याचे आश्वासन चंद्रपूर-गडचिरोली ब्राह्मण सभा व ब्रह्मवादिनी महिला बचत गटातर्फे देण्यात आले.
या अनोख्या प्रदर्शनासाठी रोहिणी पुराणकर, मीनाक्षी अगरकाठे, रंजना वेलंकीवार, तसेच पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahman sabha and brahmavadini in chandrapur
First published on: 11-03-2015 at 07:01 IST