आर्थिक व्यवहाराच्या वादातून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या रत्नागिरी येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र रत्नू पेवेकर (५७) यांचा आज(सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्ल्यात ते नव्वद टक्के भाजले असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरणामागचे गूढ काय?
पेवेकर यांनी नवे घर बांधण्यासाठी सुनील पवार या ठेकेदाराला पैसे दिले होते. पण काम पूर्ण होत नव्हते म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी पवारला जाब विचारला.
या प्रकारानंतर रविवारी सकाळी पवारने पेवेकरांना पैसे देण्यासाठी बोलावले. पेवेकर येताच पवार व त्याच्या चार साथीदारांनी पेवेकरांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2013 रोजी प्रकाशित
जिवंत जाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र रत्नू पेवेकर (५७) यांचा आज(सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

First published on: 07-10-2013 at 10:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burn to death of psi in ratnagiri